डॉ. शे. मा. हराळे - लेख सूची

दि.य.दे. आदरांजली

गेली नागपंचमी प्रा. दि.य.देशपांडे (ती. नाना) यांचा आज तसा नव्वदावा जन्मदिन ! काही माणसे जन्माला येतात ती केवळ इतरांना काहीतरी देण्यासाठी ! देता देता ती कुठे नि कधी हरवतात हे कळतही नाही. नानांचे देहदान अन् चक्षुदान हे दैहिक पातळीवर असले तरी ‘देहाचे पारणे फिटणे’ ही विज्ञाननिष्ठ भूमिका त्यामागे आहे. आयुष्यभर देहाची जराही चिंता न बाळगणाऱ्या …

‘आश्रमहरिणी’च्या निमित्ताने

आश्रमहरिणी ही वामन मल्हार जोशी यांची एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी. वामनरावांची कलात्मकता, त्यांची वैचारिकता आणि त्यांची प्रागतिक सामाजिक विचारसरणी या कादंबरिकेत प्रभावीपणे प्रगटली आहे. धौम्य-सुलोचना – भस्तिगती यांची त्रिकोणी प्रेमकथा एवढाच या कादंबरीचा आशय नाही, तर विधवापुनर्विवाह आणि अपवादात्मक परिस्थितीत द्विपतिकत्वही समर्थनीय ठरू शकते असे प्रतिपादन करणारी ही कादंबरी आहे. बालविवाहाचा निषेध आणि विधवा-पुनर्विवाहाचा पुरस्कार एकोणिसाव्या …